
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
अहमदनगर - पुणे महामार्गावर मध्यभागापासून 40 मीटरच्या आत असणार्या 550 अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. तर बांधकाम विभाग व चेतक एन्टंरप्राजेसच्या वतीने विविध ठिकाणी मार्ग दुरुस्तीला पुन्हा वेग आला आहे.
अहमदनगर - पुणे महामार्गावर दोन महिन्यांपुर्वी वहान चालकांची चुकी, अतिक्रमणे व दुभाजकांची झालेली तोडफोड यामुळे मोठ्या प्रमाणात आपघात झाले होते. यात अनेकांना आपले प्राणही गमावे लागले होते. तर अनेकांना अपगंत्व आले. या सर्वाचा रोष सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनावर आला होता. सुप्याचे पोलीस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांनी पुढाकार घेत तहसिलदार शिवकुमार आवळकठे यांच्या उपस्थित संबधित विभागाच्या प्रतिनिधी सोबत वेळोवेळी बैठका घेत यावर उपाय योजना आखल्या.
तहसिलदारांनी अतिक्रमण धारक व्यावसायिकांना महामार्गाच्या नियमानुसार रोडच्या मध्यापासुन 40 मिटरपर्यतची अतिक्रमने काढली जातील अशी तंबी दिली होती. त्यानंतर काही व्यावसायिकनी काही अंशी अतिक्रमने काढून घेतली तर सार्वजनिक बांधकाम विभागानी आज अखेर 550 पेक्षा अधिक अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रोडवरील छोटे मोठे खड्डे बुजवने, तोडलेले रोड दुभाजक बुजवने, साईट पट्ट्या भरणे, काळे पांढरे पट्टे रंगवणे आदी महत्त्वाची कामे तातडीने करत असुन जसजशी अतिक्रमने निघतील तेथे बाजुच्या साईड पट्ट्या भरुन काढल्या जातील असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर - शिरुर या मार्गावरील अतिक्रमण धारकाना नोटीशा देऊन 15 दिवसांच्या आत स्वतः हून अतिक्रमणे काढण्याची सुचना केली आहे. अन्यथा पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे तोडली जातील अशे नोटीसीत सांगाण्यात आले आहे.
तहसिलदार, पोलीस निरिक्षकांना श्रेय
अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघात वाढल्यानंतर अतिक्रमणे, दुभाजक दुरूस्ती होण्यासाठी तहसिलदार अवळकंठे, पोलीस निरिक्षक गोकावे यांनी मोठी प्रयत्न केले. त्यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, बीओटी बांधकाम कंपनी, महामार्ग पोलिस, आर. टी.ओ. अधिकारी, एसटी परिवहन अधिकारी यांच्या बैठका घेत विविध उपाययोजना राबवण्यत आल्या परिणामी अपघाताचे प्रमाणात घटले आहे. याचे श्रेय तहसिलदार अवळकंटे व पोलीस निरिक्षक गोकावे यांना असल्याचे नागरीक बोलत आहेत.