चास कामरगाव घाटात लष्कराची गाडी पलटली

नगर-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच
चास कामरगाव घाटात लष्कराची गाडी पलटली

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघाताची (Ahmednagar Pune Highway Accident) मालिका थांबता थांबेना. आज मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान चास कामरगाव घाटात लष्कराची सैनिक असलेली गाडी पलटी (Army Vehicle Accident) झाली आहे. गाडीतील सैनिकांना सुदैवाने किरकोळ जखमा झाल्या आहेत.

याबाबत नगर तालुका पोलिसांनी सांगितले कि, सदर सैनिकी जवान पुण्यावरुन नगरच्या दिशेने जात असतांना चास कामरगाव घाटात श्वान आडवे आले. जवानांच्या गाडी चालकाने त्या श्वानांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु घाट उतार रस्ता व गाडीला असलेला वेग व वळण यामुळे गाडी पलटी झाली.

घटनेची माहिती कळताच नगर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहीका व क्रेन ही ताबडतोब कामरगाव घाटात पाठवले. सर्व सैनिक सुखरूप बाहेर निघाले. त्यांना काही प्रमाणात जखमा झाल्या असुन त्यांना नगरला रुग्णालयात दाखल केले असुन सर्व सैनिक सुरक्षित आहेत. असेे नगर तालुका पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघात मालिका चालुच असुन मंगळवारी नारायणगव्हाण ता.पारनेर व चास कामरगाव ता. नगर येथे दोन ठिकाणी अपघात झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com