कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार

अहमदनगर - पुणे महामर्गावर वाघुंडे शिवारात घटना
कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर - पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) शनिवारी (दि.17े) दुपारी कार चालकाचे वहानावरील नियंत्रण सुटून भरधाव कार कंटेनरला (Car-Container Accident) बाजूने जाऊन धडकल्याने झालेल्या आपघातात दोघाचा जागीच मृत्यू (Death) झाला तर तिघे जखमी झाले आहेत.

कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार
दुधाच्या टँकरला दोन मोटार सायकलची धडक, 3 ठार एक गंभीर

ओंकार रविद्र शिंदे व राहुल विलास गुंजाळ (रा. सनसवाडी, ता. शिरूर) अशी या घटनेत मृत्यु झालेल्या युवकांची नावे आहेत. तर प्रमोद रविंद्र धन्वे, अविनाश भागवत वारभुवन व विशाल अशोक कदम अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी सणसवाडी (Sanaswadi) येथील पाच युवक  त्यांच्या कार क्रमांक (एमएच 12 युएन 0593) या गाडीने शिर्डी (Shirdi) येथे देव दर्शनासाठी जात होते.

कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार
अपघातात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा मृत्यू

सुपा (Supa) टोल नाक्याच्या पूढे वाघुंडेे बुद्रुक गावच्या हद्दीत कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटुन कार उभ्या आसलेल्या कंन्टेनरला  बाजुने जाऊन धडकली. यात जास्त वेगामुळे गाडी कंटेनरच्या खाली घुसली याअपघातात (Accident) ओंकार रविद्र शिंदे व राहुल विलास गुंजाळ हे दोघे जागीच ठार झाले. तर इतर तिघे जखमी झाले आहे आहेत. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिसांनी (Supa Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात (Accident) ग्रस्त गाडीतून व्यक्तीना बाहेर काढले व त्यांना सुपा (Supa) येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार
डॉ. अजित नवले यांच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध ?
कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार
गावकरी झाले गुरूजी; या गावात संपकाळात शाळा सुरू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com