कार अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

कामरगाव शिवारातील घटना
कार अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

अज्ञात वाहन व कारच्या अपघातात (Car Accident) कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू (Father And Son Death) झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव जोंडे ता. मालेगाव, जि. नाशिक) अशी अपघातात (Accident) मृत झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावरील (Ahmednagar-Pune Highway) कामरगाव (Kamargav) (ता. नगर) शिवारात सोमवारी पहाटे हा अपघात (Accident) झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

बाजीराव मिसकर हे हरीयाणा राज्यात सैन्य दलात नोकरीला होते. ते सुट्टी निमित्त गावी आले होते. रविवारी रात्री ते त्यांच्या कारने मुलगा ओमसह जेजुरी (पुणे) येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे अहमदनगर-पुणे महामार्गावरील (Ahmednagar-Pune Highway) कामरगाव (Kamargav) शिवारातून जात असताना त्यांच्या कारची समोरील वाहनास धडक बसली. अपघात ऐवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. यामध्ये दोघा पिता-पुत्राचा जीव गेला. अपघातातनंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com