
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar
अहमदनगर-पुणे महामार्गावर रविवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान एका मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडल्याने झालेल्या आपघातात तो जागीच ठार झाला.
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, एमएच 05 सीझेड 6330 या मोटारसायकलवर एक युवक (नाव वय समजु शकले नाही) रविवारी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असतांना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आसावे व तो महामार्ग सोडून रस्ताच्या खाली उतरला व लांब खड्ड्यात जाऊन पडल्याने अपघात ग्रस्त झाला. यात तो युवक जागीच ठार झाला.
स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती सुपा पोलिस स्टेशनला दिल्यावर पी एस आय तुळशीराम पवार, खडेराव शिंदे व रमेश शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहीका बोलावून सदर व्यक्तीला उचलून रुग्णवाहीकेतुन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असुन त्याच्या जवळील कागदपत्रावरुन त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला जात आहे.
अहमदनगर-पुणे महामार्गावर साईड पट्टा न भरने, धोकादायक वळणे व रिफलेक्टर नसणे, सुचना फलकाचा अभाव यामुळे अपघात होत आहेत. मागील वर्षी महामार्गावर अनेक बळी गेले असुन वारंवार सांगुनही सार्वजनिक बांधकाम विभाग या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.