
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात मंगळवारी रात्री आज्ञात वाहनाची धडक (Accident) बसुन एका युवकाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला.
याबाबत नरहरी सुदाम मुंडे (रा. सुपा) यांनी सुपा पोलिस स्टेशनला (Supa Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संजय गंगाधर फड (वय 32 रा. कन्हेरवाडी ता. परळी जिल्हा बीड) हा मंगळवार (दि 10) रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान अहमदनगर- पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) वाडेगव्हाण (Vadegavhan) शिवारातील हॉॅटेल जनक समोर राञीच्या वेळी रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक (Accident) दिली. त्यात ते जबर जखमी (Injured) होऊन जागीच ठार झाले आहे.
सुपा पोलिसांनी (Supa Police) नरहरी मुडें यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्युची (Death) नोंद केली असुन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तराय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
सुपा पोलिस स्टेशनचे (Supa Police Station) पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.