नगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना!

पाहा अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTO
नगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना!

पारनेर | तालुका प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं अपघात सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी पहाटे जातेगाव घाटात एक भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पाच जण जखमी झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, जातेगाव घाटातील हाँटेल विनायक स्मृती येथुन माल ट्रक (MH 12 FZ 3287) हाँटेल कडून रस्ता ओलांडून पुण्याच्या दिशेला वळत असताना अहमदनगरहून पुण्याच्या दिसेने इनोव्हा कार (MH 43 L 4434) ट्रकवर आदळली.

या अपघात दरम्यान अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या खाजगी बस (MP 41 T 1564) चालकाच्या नजरेस समोर अपघात झाल्याचे निदर्शनास आले.

त्याने प्रसंगासवधान राखून ५० ते १०० फुट बस रस्ता दुभाजकावर ओढली व समोरील कारमधील चार ते पाच व्यक्तीचे प्राण वाचवले. खाजगी बस चालकाने गाडी दुभाजकावर घातली नसती तर ट्रक व लक्झरीच्यामध्ये आलेय कारचे व त्यामधील प्रवाशाचे मोठे नुकसान झाले असते.

या अपघातात पाच जण जखमी झाले असुन त्यांना सुपा पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com