दुचाकी व पिकअप वाहनाचा अपघात; एक ठार एक गंभीर जखमी

नगर-पुणे महामार्गावर घडली घटना
दुचाकी व पिकअप वाहनाचा अपघात; एक ठार एक गंभीर जखमी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

गुरुवारी सकाळी अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) राळेगण सिद्धी (Ralegan Siddhi) फाट्यावर दुचाकिस्वार पिकअप गाडीला पाठीमागुन (Pickup Vehicle Accident) धडकुन रोड दुभाजकावर पडून झालेल्या अपघातात त्यातील एक जण जागीच ठार (Death) झाला असुन दुसरा गंभीर जखमी (Injured) झाला आहे. त्यास खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत सुपा पोलिसांनी (Supa Police) दिलेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटे सकाळी 6.30 मी. बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक खोडलेला आहे (मोडतोड) दोघे नगर-पुणे महामार्गावरुन शिरुरकडून नगच्या दिशेने येत असतांना वाडेगव्हाण शिवारातील राळेगण सिद्धी फाटा (Ralegan Siddhi) ते दुर्गा लॉनच्या दरम्यान पुढे चाललेल्या पिकअप वाहनाला पाठीमागुन जोरात धडकुन रोड दुभाजकावर जाऊन पडले. गाडीला वेग खुप असल्या कारणाने दोघेही जोरात रोड दुभाजकावर आदळले. यात एक जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनच्या (Supa Police Station) पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस स्टेशनचा फौज फाटा व सादिकभाई रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुपा पोलिसांनी जखमीला तात्काळ अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले तर घटनास्थळी आवश्यक पंचनामा करून एकाचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सुपा पोलिसांनी घटनास्थळी मोटारसायकल व सदर व्यक्तीची तपासणी केली असता एका जवळ गलुल आढळून आली. सदर व्यक्तीची नावे समजु शकली नाही असेे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुपा पोलिस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com