
शिरूर |प्रतिनिधी| Shirur
पुणे-अहमदनगर महामार्गावर कारेगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठिमागून भरधाव कार आदळल्याने पाटोदा येथील एकाच कुटुंबातील चार जण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना आज (दि.21) दुपारी घडली.
सुदाम शंकर भोंडवे (65), सिंधुबाई सुदाम भोंडवे, (55), कार्तीकी अश्विन भोंडवे (35), आनंदी अश्विन भोंडवे (2.5 वर्षे) रा. सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर यात अश्विन सुदाम भोंडवे (38) हे जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी अश्विन भोंडवे हे बीड वरून चाकण येथे आपल्या पाहुण्याकडे अहमदनगर-पुणे रोडने जात असताना कारेगावच्या हद्दीतील फलकेमळा येथे रोडवर डाव्या बाजूस उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच 43 बीजी 2776) ला पाठीमागून कार जाऊन धडकल्याने अपघात झाला. धडक इतकी भयंकर होती की यात जखमींना उपचारास नेण्यापुर्वी त्यांचा मृत्यू झाला. कंटेनर चालक बबलु लहरी चव्हाण (रा.कुनगाईखुर्द, पो. इटवा,उत्तर प्रदेश) याच्या विरुद्ध रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.