नगरमधील 17 खासगी रुग्णालयांतील 296 बेड आरक्षित
सार्वमत

नगरमधील 17 खासगी रुग्णालयांतील 296 बेड आरक्षित

जिल्हाधिकार्‍यांनी वाढत्या करोना पार्श्वभूमीवर काढले आदेश

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरातील 17 हॉस्पिटलमधील 740 बेड्सपैकी 40 टक्के बेड म्हणजेच 296 बेड हे करोनासाठी आरक्षित करण्याचे आदेश काढले आहेत.

संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आणि आवश्यक कर्मचार्‍यांना त्य ठिकाणी दाखल होणार्‍या करोना रुग्णांवर उपचार करावा लागणार आहे.

नगर महापालिका हद्दीमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ विचारात घेता बाधित रुग्णांवर उपचाराच्या सोयीसाठी खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडील बेडस आरक्षीत करुन त्याठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वीत करुन रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयातील जीवरक्षक प्रणालीसाठी आवश्यक साधनसामग्रीव्दारे करोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

मनपा हद्दीतील 17 खासगी रुग्णालयात 740 बेडस् बसून यातील 40 टक्के बेड्स म्हणजेच 296 बेड या करोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

हॉस्पिटल आणि आरक्षित बेडस्

स्पीटल चौपाटी कारंजा एकूण बेड 38 आणि आरक्षित बेड 15. अंबीका नर्सिंग होम केडगाव एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14. गॅलक्सी हॉस्पीटल झोपडी कॉन्टीन जवळ एकूण बेड 47 आणि आरक्षित बेड 19. अनभुले हॉस्पीटल प्रेमदान चौक एकूण बेड 33 आणि आरक्षित बेड 13. खालकर हॉस्पीटल सथ्था कॉलनी एकूण बेड 40 आणि आरक्षित बेड 16. बालाजी पिडीयाट्रिक अण्ड डेंटल हॉस्पीटल एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14. प्रणव हॉस्पीटल मल्टीस्पेशाल्लीटी अण्ड आयसीय सेंटर एकूण बेड 44 आणि आरक्षित बेड 18.

झावरे पाटील हॉस्पीटल अण्ड नर्सिंग होम रावबहादुर नगर एकूण बेड 31 आणि आरक्षित बेड 12. पाटील अँक्सीडेन्ट हॉस्पीटल कोठीचॉक एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14. फाटके पाटील हॉस्पीटल स्टेशन रोड एकूण बेड 40 आणि आरक्षित बेड 16. अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सावेडी एकूण बेड 35 आणि आरक्षित बेड 14. श्रीदिप हॉस्पिटल बडवे पेट्रोलपंप एकूण बेड 53 आणि आरक्षित बेड 21. सिध्दविनायक सक्कर चौक एकूण बेड 60 आणि आरक्षित बेड 24.

क्रीस्टल हॉस्पिटल झोपडी कॅटिंग एकूण बेड 59 आणि आरक्षित बेड 24. सिटी केअर ट्रस्ट हॉस्पीटल, तारकपुर एकूण बेड 59 आणि आरक्षित बेड 20. देशपांडे हॉस्पिटल पटर्वधन चौक एकूण बेड 63 आणि आरक्षित बेड 25. आरोग्य अग्रवाल हॉस्पिटल स्वामी समर्थ मंदिर एकूण बेड 42 आणि आरक्षित बेड 17 यांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com