नगरची प्रणिता सोमण सायकलिंगची राज्य कर्णधार

नगरच्या सात खेळाडूंचा महाराष्ट्र संघात समावेश
नगरची प्रणिता सोमण सायकलिंगची राज्य कर्णधार

अहमदनगर (प्रतिनिधी)

हरिणाया येथे २५ ते २८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या २६ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपटू नगरची प्रणिता सोमण करणार आहे.

स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नगरचे संकल्प थोरात, अपुर्वा गोरे, अपर्णा गोरे, सिद्धात पिडीयार, ओम करांडे, प्रणव धामणे या खेळाडूंचीही विविध गटामध्ये निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप जाधव व सचिव प्रा. संजय साठे, खजिनदार भिकन अंबे यांनी जाहीर केला. यात प्रणिता सोमणची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

नगरच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व खेळाडूंना प्रा. संजय साठे, प्रा. संजय धोपावकर, प्रा. साईनाथ थोरात आदिंचे मार्गदर्शन लाभले आहे. हे सर्व खेळाडू पेमराज सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राजेंद्र सोनी, प्रशिक्षक बिरु भोजने, सहप्रशिक्षक व व्यवस्थापक पांडूरंग भोजने, मेकॅनिक व्यवस्थापक केशव शिंदे काम पाहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com