अहमदनगर : हातभट्टी अड्ड्यांवर एलसीबीची छापेमारी

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांवर गुन्हे
अहमदनगर : हातभट्टी अड्ड्यांवर एलसीबीची छापेमारी

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील ठिकठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे आहेत. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 11 जुलै ते 21 जुलै दरम्यान जिल्ह्यातील 36 ठिकाणच्या हातभट्टी दारू अड्ड्यावर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान हातभट्टी दारू, कच्चे रसायन, भट्टीचे साधने असा पाच लाख सहा हजार 880 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी 38 आरोपीविरोधात जामखेड, सोनई, नगर तालुका, श्रीरामपूर शहर, राहुरी, कोतवाली, श्रीरामपूर तालुका, शिर्डी, भिंगार, कर्जत, शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, संगमनेर तालुका, पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक आश्‍वती दोर्जे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com