
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा पोलीस दलातील (District Police Force) रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी मार्गी लावला आहे. पोलीस दलातील 503 पोलीस कर्मचार्यांना पदोन्नती (Promotion of police personnel) देण्यात आली आहे. अधीक्षक पाटील यांनी याबाबत गुरूवारी रात्री आदेश काढले आहेत.
यामध्ये पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक 107, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 189 आणि पोलीस शिपाई ते पोलीस नाईक 207 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अधीक्षक पाटील यांच्या या निर्णयामुळे गेल्या दोन- तीन वर्षांपासून पोलीस दलातील रखडेला पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधीक्षक पाटील यांनी लक्ष घातले होते. यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडून तब्बल 503 कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली असून पोलीस कर्मचार्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.