दिल्लीगेट परिसरात पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
सार्वमत

दिल्लीगेट परिसरात पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

करोना प्रादुर्भाव वाढल्याने दिल्लीगेट परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे

Anant Patil

अहमदनगर (प्रतिनिधी) - दिल्लीगेट कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करून न दिल्याने दोघांनी एका पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याची घटना आज एकच्या सुमारास घडली. हे पोलीस कर्मचारी तोफखाना पोलीस ठाण्याचे आहेत.

धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. करोना प्रादुर्भाव वाढल्याने दिल्लीगेट परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

या ठिकाणी तोफखाना पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. दुपारी दुचाकीवर आलेल्या दोघांनी या पोलीस कर्मचाऱ्यांशी झोनमध्ये प्रवेश करण्यावरून वाद घातला. या वादातून त्या दोघांनी एका पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली आहे

Deshdoot
www.deshdoot.com