नगर : सहायक फौजदाराचा करोनामुळे मृत्यू
सार्वमत

नगर : सहायक फौजदाराचा करोनामुळे मृत्यू

जिल्हा पोलीस दलातील पहिला बळी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmedngar -

पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या एका 55 वर्षीय सहाय्यक फौजदारांचा करोनामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी या फौजदारांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा पोलीस दलात करोनामुळे पहिला बळी गेला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील पोलीस दिवसरात्र करोना आजाराशी लढा देत आहे. पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सहाय्यक फौजदारांनी जिल्ह्यातील विविध भागात चार महिन्यांपासून करोना बंदोबस्तासाठी करोनायोद्धा म्हणून जबाबदारी पार पाडली होती. मागील दहा दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने करोना चाचणी केली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी त्यांच्या पत्नीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलात करोनाने शिरकाव केला नव्हता. मागील दहा दिवसांपूर्वी या फौजदारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. करोनामुळे सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com