छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज विषयी वादग्रस्त वक्तव्य
छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी

अहमदनगर|Ahmedagar

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला भाजपचा (BJP) माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (Shripad Shankar Chhindam) (वय- ३५) याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृहविभागाने (Home Department) परवानगी दिली आहे.

छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी
श्रीरामपुरात कत्तलीसाठी आणलेले पाच गोवंश पोलिसांनी पकडले

शासकीय पदावर असल्या कारणाने भादंवि कलम १९६ (१) अ प्रमाणे तोफखाना पोलिसांनी (Tofhkhana Police) गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे येत्या दोन दिवसात छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहे.

छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृह विभागाची परवानगी
Coronavirus : जिल्ह्यात आज पाचशेहून अधिक रुग्णांची नोंद

फेब्रुवारी २०१८ मध्ये छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन करून वाद घातले होते. छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. आता या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com