नगरमध्ये एक हजार बेडचे हॉस्पिटल

ना. थोरात : लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविण्याची गरजेचे
नगरमध्ये एक हजार बेडचे हॉस्पिटल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरमध्ये औरंगाबाद, पुणेच्या (Aurangabad, Pune) धर्तीवर एक हजार बेडचे सुसज्ज (Equipped hospital with one thousand beds) हॉस्पिटल बांधण्याचे विचाराधीन असल्याचे सांगत तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केल्याची माहिती महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली. तसेच जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविण्याची गरजेचे आहे. राज्य पातळीवर पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी लशीचा (Vaccine) अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालू असे ना. थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ना. थोरात यांनी करोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक (Review meeting on Corona measures) घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Rajendra Kshirsagar), जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore), सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची उपस्थिती होती.

नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालय (Ahmednagar District Hospital) हे मध्यवर्ती भागात असून तेथे भरपूर मोकळी जागा आहे. त्या जागेत औरंगाबादच्या घाटी व पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर हॉस्पिटल उभारणे शक्य आहे. तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. प्रस्ताव आल्यानंतर तो मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील. दुसर्‍या लाटेत असलेल्या उणिवा भरून काढण्याची सूचना जिल्हा प्रशासनाल केली आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुरेसा ऑक्सिजन व बेड उपलब्ध करण्याचे नियोजन झाल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, महसूलमंत्री ना. थोरात यांना जिल्हा प्रशासन करीत असलेल्या करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.

ना थोरात यांनी काल नुतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या कामांची पाहणी केली. यावेळी ना. थोरात म्हणाले, नूतन इमारत आता पूर्णत्वाकडे आली आहे. इमारतीची राहिलेली कामे अधिक गतीने आणि दर्जेदारच झाली पाहिजेत. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करु नये. जिल्हाधिकारी कार्यालय इमारत ही जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशासकीय दृष्ट्या अधिक महत्वाची आहे. तेथील कामाची गुणवत्ता ही सर्वेोच्च हवी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हाधिकारी इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी (Adequate funds for construction of Collector building) आता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे अधिक वेगाने काम करुन इमारत पूर्णत्वाला न्या, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी त्यांना इमारत बांधकामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.यावेळी ना.थोरात यांच्यासह आ.डॉ. तांबे, आ. कानडे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com