सोमवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप

प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी
सोमवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबीत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.

या संपाचे निवेदन महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव रोडी, उपाध्यक्ष बाळासाहेब इघे, सचिव संतोष कानडे, देविदास थोरात यांनी पुणे विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांना दिली.

आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०-२०-३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com