नववर्षाचे आशावादी स्वागत

नववर्षाचे आशावादी स्वागत

आतषबाजीसह जल्लोष । अनेकांकडून निर्बंधांकडे दुर्लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनामुळे (corona) २०२१ या वर्षावरही करोनाचे सावट राहिले. मात्र येणारा काळ करोनामुक्त आणि सकारात्मक उर्जेचा ठरो, या आशावादासह नागरिकांनी २०२२ या नववर्षाचे (new year) जल्लोषात स्वागत केले. अनेकांनी मध्यरात्री आतषबाजी केल्याने आसमंत उजळून निघाला होता. नगर शहरात मोठ्या हॉटेल्समध्ये संगीत रंगले. दरम्यान, प्रशासनाने अनेक निर्बंध लावलेले असताना काही ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.

नववर्षाचे आशावादी स्वागत
नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

२०२१ या वर्षाला निरोप देताना नागरिकांच्या संमिश्र भावना होत्या. या वर्षाने अनेकांना नकोशा आठवणी दिल्या जवळच्या प्रिय व्यक्ती अनेकांनी गमावल्या. अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती घसरलेली असताना हॉस्पिटलच्या बिलांनी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. निराशाजनक ठरलेल्या २०२१ ला अलविदा करत २०२२ या नववर्षाचे नव्या उमेदीने स्वागत करण्यात आले.

नववर्षाचे आशावादी स्वागत
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

सर्वसामान्य नागरिकांनी आशावादासह परिवारासह आनंद साजरा करत या वर्षाचे स्वागत केले. मात्र काहींनी आपला उत्साह आतषबाजी आणि संगीत नृत्यांतून व्यक्त केला. शहरातील सर्वच हॉटेल्स नववर्ष स्वागतासाठी सजल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत तेथे उत्साह ओसंडून वाहत होता.

मेणबत्ती रॅली!

नाताळ सणानिमित्त अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती रॅली काढण्यात आली. अहमदनगर पहिली मंडळी आचार्य रेव्ह जनार्दन वाघमारे, लेलीडर सुनील नन्नवरे, अहमदनगर पहिली मंडळीचे सेक्रेटरी अमोल लोंढे, खजिनदार सॅम्युवेल खरात, कार्यक्रम समिती अध्यक्ष राहुल थोरात, सुनित ढगे, अजित ठोकळ, शिरीष लाड, ईदरनिल देठे, गिरीष शिरसाठ, श्रीकांत गायकवाड, प्रसन्ना शिंदे, शिल्पा खरात, अर्चना लोखंडे, सौ कुसुम थोरात, तरूण संघ अध्यक्ष हर्षल जाधव, महिला मंडळ, जेष्ठ संघ, तरूण संघ, संडेसकूल व मान्यवर मंडळीतील सर्व सभासद वर्ग उपस्थित होते.

नववर्षाचे आशावादी स्वागत
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

अहमदनगर पहिली मंडळी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. मानव जाती अंधारात होती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर मानव जात प्रकाशात आली. प्रत्येक वर्षी प्रभू येशू ख्रिस्ताने जो नवा प्रकाश आम्हाला मंदिरामधून दिला आहे. तो आम्ही घेऊन समाजामध्ये नव प्रकाशाची साक्ष देऊन समाज घडवण्याचे काम केले जात आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचे विचार प्रत्येकाने अंगीकारून समाज घडवावे नगर शहरामध्ये कोरोणा चे संकट दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. आज कॅन्डल रेली काढून अंधारातून प्रकाशाची नवी साक्षी घेऊन समाज घडवण्याचे काम केले जात आहे असे प्रतिपादन अहमदनगर पहिली मंडळीच्या आचार्य रेव्ह जनार्दन वाघमारे यांनी केले.

नववर्षाचे आशावादी स्वागत
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

Related Stories

No stories found.