अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून वीस गाड्या देण्यात येणार आहे. उद्या मंगळवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या गाड्या एसपींकडे सुर्पूद करण्यात येणार आहे.

5 स्कॉर्पिओ आणि 15 बोलेरो अशा वीस नवीन गाड्या जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार आहे. या नव्या गाड्या मिळाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक वेगवान होईल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे उद्या नगर जिल्हा दौर्यावर आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास या गाड्या एसपींना प्रदान केल्या जातील. तसेच तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्राची सुरूवातही मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

ग्रामपंचायतींना पुरस्कार

स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम योजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते केला जाणार आहे. सावेडीत होणार्या या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सदस्य उपस्थिती राहणार आहेत.