जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा (Ahmednagar New Collector Office Building) उद्घाटन समारंभ उद्या (दि.29) सकाळी 11.00 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या हस्ते तसेच ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister of Soil and Water Conservation Shankarrao Gadakh), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, शिर्डी श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, खा. सदाशिवराव लोखंडे, खा. सुजय विखे-पाटील, तसेच जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद चे सर्व सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com