मराठा आरक्षणासाठी युवक राष्ट्रवादी मोदींना पाठविणार पाच लाख पत्र

कपिल पवार : राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनापासूनचा उपक्रम
मराठा आरक्षणासाठी युवक राष्ट्रवादी मोदींना पाठविणार पाच लाख पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)

गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रसेच्यावतीने आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आग्रही राहिलेला असून यामुळेच जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी जिल्ह्यातून पाच पाच लाख पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिली असून याची सुरूवात राषट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी युवक राष्ट्रवादी मोदींना पाठविणार पाच लाख पत्र
जवळकेत उपसरपंचाचा राजीनामा; कोपरगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार, तसेच उपमुख्यमंत्री तथा युवक राष्ट्रवादीचे प्ररेणास्थान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मार्गदर्शक मानून राष्ट्रवादी युवक संघटनेकडून मराठा आरक्षणासाठी अभियान सुरू सुचना युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिले होते. त्यांची अंमलबजावणी जिल्हाध्यक्षा पवार यांनी सुरू केली आहे. राज्यात सध्या करोना सोबतच मराठा आरक्षणाचा विषय जागत आहे. वास्तवात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. मात्र, विरोधी पक्षाकडून समाजात नेहमी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठीच युवक राष्ट्रवादीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनाा नगर जिल्ह्यातून पाच लाच लाख पत्र पाठविण्याचा संकल्प केला असल्याचे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी युवक राष्ट्रवादी मोदींना पाठविणार पाच लाख पत्र
चंदन गॅंगला कोण लावतय चंदन?

या कार्याची सुरूवात संगमनेर येथून पवार, संगमनेरचे तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, युवक कॉग्रेसचे कार्याध्यक्ष संजय काळगे यांनी शेवगाव तालुक्यातून, राहाता तालुक्यातून शिर्डी येथून संदिप सोनवणे व विशाल भडांगे तर अकोल्याचे आ. किरण लहामटे यांच्यासोबत तालुकाध्यक्ष रविंद्र मालुंजकर, शहराध्यक्ष अमित नाईवाडी, कोपरगाव शहाराचे अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी सुरूवात केली असल्याची माहिती पवार यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com