2 हजार 773 प्रकरणे निकाली ; 19 कोटी रुपयांची वसुली

दहा महिन्यांनंतर भरलेल्या लोकन्यायालयास मोठा प्रतिसाद
2 हजार 773 प्रकरणे निकाली ; 19 कोटी रुपयांची वसुली

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात

आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोकन्यायालयास जिल्ह्यातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 2 हजार 773 प्रकरणे निकाली काढण्यात आली, त्यातून 19 कोटींची वसुली झाली.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करत काळजी घेण्यात आली. तसेच गर्दी टाळण्यासाठी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात उद्घाटन समारंभाचे आयोजन न करता न्यायधीशांच्या नियोजन बैठकीत न्या. आणेकर यांनी औचारिकपणे लोकन्यायालयाच्या कामास सुरुवात केली. यावेळी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए. एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सतीश पाटील, सेन्ट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष काकडे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य वकील व कर्मचारी उपस्थित होते.

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नगर जिल्हा न्यायालयात दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. अ‍ॅक्ट प्रकरणे, बँकांच्या कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्या खालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी अ‍ॅक्टची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या आगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे आपसी समझोत्या करीता ठेवण्यात आले होते. यामध्ये एकूण 20,418 प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 2,773 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यावेळी 19 कोटी 2 लाख 67 हजार 703 रुपये रक्कम वसुल करण्यात आली. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व जिल्हा न्यायालयाच्या कार्माचारींनी लोकन्यायालयाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com