
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
28 व 29 मार्च रोजी होणार्या देशव्यापी संपात (Nationwide Strike) मनपातील (Ahmednagar Municipal Corporation) अत्यावश्यक सेवांसह सर्व कर्मचारी (Workers) सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सरचिटणीस कॉ. उदय भट (Uday Bhat) यांनी दिली.
केंद्र सरकारच्या (Central Government) अन्यायकारक धोरणाविरोधात तसेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी राज्याच्या विधीमंडळात मनपा (Municipal Corporation), नगरपालिका (Municipality), नगरपंचायत (Nagar Panchayat), नगरपरिषदा (Municipal Council), छावणी मंडळे (Camp Circles), शासकीय रूग्णालये (Government Hospitals), जिल्हा परिषद (Zilla Parishad) ग्रामपंचायत सहित शासकीय कार्यालयातील सफाई कामगारांना (Sweepers) राज्याच्या विधी मंडळाने मंजुरी देऊन स्वीकारलेल्या व राज्य सरकारवर बंधनकारक असलेल्या लाड- पागे समितीच्या शिफारशी पूर्णपणाने रद्दबातल करण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री या नात्याने घोषित केले आहे.
सफाई कामगारांचे अस्तित्व व त्यांना प्राप्त असलेले लाड-पागे समितीच्या शिफारशी नुसार मिळालेले हक्क धोक्यात आले असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात28 व 29 मार्च रोजी देशातील सर्व केंद्रीय व राज्यस्तरीय कामगार संघटनांच्यावतीने दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार मनपातील अत्यावश्यक सेवांसह सर्व कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.