महिला बालकल्याण समितीही शिवसेनेला ?

नव्या समितीसाठी विशेष महासभा; काँगेसची उपसभापतींवर बोळवण
महिला बालकल्याण समितीही शिवसेनेला ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress) महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) राजकारणात (Political) एकत्र असल्याचा दावा केला जात असला तरी कोणतेही पद नसलेल्या काँग्रेसला (Congress) पुन्हा सत्तेपासून दूर ठेवण्याचा घाट घातला जात आहे. महिला व बालकल्याण समिती (Women and Child Welfare Committee) विसर्जीत करण्यात आल्यानंतर ही समिती शिवसेनेकडे (Shivsena) घेण्याची व्यूहरचना आखली जात असून काँग्रेसची उपसभापती (Congress Deputy Speaker) पदावर बोळवण केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

महापालिकेतील (Ahmednagar Municipal Corporation) सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपाकडे (BJP) महिला व बालकल्याण समितीचे (Women and Child Welfare Committee) सभापती पद होते. राष्ट्रवादी (NCP) व शिवसेना (Shivsena) नगरसेवकांच्या पत्रानंतर ही समिती विसर्जीत करण्याकरिता सोमवारी ऑनलाईन महासभा (Online Meeting) झाली. या सभेत काही मिनिटांत ठराव मंजूर करत समिती विसर्जीत करण्यात आली. आता नव्याने 16 सदस्य नियुक्ती करण्यासाठी पुन्हा विशेष महासभा बोलावली जाणार आहे. त्यानंतर सभापती व उपसभापतिची निवडणूक होणार आहे.

शिवसेनेचा महापौर (Mayor of Shivsena) करताना राष्ट्रवादीने उपमहापौर NCP Deputy Mayor), स्थायी समिती सभापती (Standing Committee Speaker) पद घेतले. विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) पद अजूनही राष्ट्रवादीकडेच (NCP) आहे. भाजपाअंतर्गत (BJP) या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. महिला व बालकल्याण समिती (Women and Child Welfare Committee) सभापती पद काँग्रेसला देऊन सत्तेचा समतोल साधला जाईल, अशी चर्चा असतानाच सभापती पद मिळावे यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखली आहे. काँगेसला उपसभापती पद देऊन बोळवण केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com