मनपाची 'इतक्या' टक्के शास्तीमाफी

आयुक्तांचा निर्णय : महिनाभर सवलत
मनपाची 'इतक्या' टक्के शास्तीमाफी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेची (Ahmednagar Municipal Corporation) संकलित कराची थकबाकी वसुली (Recovery of Arrears of Tax) वेगाने व्हावी यासाठी नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Commissioner Dr. Pankaj Jawale) यांनी मंगळवारपासून 100 टक्के शास्तीमाफी (Penalty Waived) जाहीर केली आहे. महिनाभर म्हणजे ऑगस्ट अखेरीपर्यंत ही शास्ती माफी सवलत असून, त्यानंतर संकलित कर थकबाकीदारांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई (Action) केली जाईल, असा इशाराही (Hint) त्यांनी दिला आहे. नगर मनपाची 232 कोटींची घरपट्टी-पाणीपट्टी व अन्य संकलित कराची थकबाकी (Tax Arrears) आहे. त्यात सुमारे 101 कोटींची शास्तीची रक्कम आहे.

एप्रिलपासून तीन महिने मनपाद्वारे संकलित करावर 8 ते 10 टक्के सवलत दिली जाते. पण जुलैनंतर थकबाकीवर मासिक 2 टक्के दराने दंड आकारणी (शास्ती) होते. वर्षानुवर्षाची ही शास्तीची सुमारे 100 कोटीवर रक्कम आहे. ती माफ करण्याची तयारी नवे आयुक्त डॉ. जावळे यांनी दाखवली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना आता केवळ मुद्दल रक्कमच भरावी लागणार असल्याने त्यांनी ती तातडीने भरण्याचे आवाहन डॉ. जावळे यांनी केले आहे. शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. जावळेंना पत्र देऊन शहरात 100 टक्के शास्तीमाफी देण्याची मागणी केली होती.

या मागणीला प्रतिसाद देत डॉ. जावळे यांनी तसा निर्णय घेतला आहे. संकलित कराच्या थकबाकीत शास्तीची रक्कम 101 कोटीची आहे. ही रक्कम वसूलच होत नाही तर तिची माफी दिल्याने दुःख नाही. किमान मुद्दलाची रक्कम तरी वसूल होईल व शहराची प्रलंबित विकास कामे मार्गी लावणे शक्य होईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, संकलित कराबाबत काही दावे न्यायालयात प्रलंबित आहेत, लोकन्यायालयातही काही दाव्यांमध्ये तडजोड केली आहे व आताही येत्या 13 ऑगस्टच्या लोकन्यायालयात काही प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवली आहेत. मात्र, आता शास्तीमाफी 100 टक्के दिल्याने थकबाकीदारांनी त्यांची मुद्दल तातडीने भरली तर बाकी प्रश्‍न राहणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com