मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला

मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समितीच्या (Standing Committee) 16 सदस्यांपैकी 8 सदस्य दोन वर्षाच्या कार्यकालानंतर 1 फेब्रुवारीला निवृत्त झाले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता (Code of Conduct) संपताच नवीन सदस्य निवडीसाठी अजेंडा काढण्यात येणार होता. मात्र, अद्यापही सदस्य निवडीचा अजेंडा रखडला आहे.

मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला
परवानगी न घेता बैलगाडा शर्यत भरवली; चौघांवर गुन्हा दाखल

रिता भाकरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे (शिवसेना), मीना चव्हाण, समद खान (राष्ट्रवादी), वंदना ताठे, रवींद्र बारस्कर (भाजप), मुदस्सर शेख (बसप) हे आठ सदस्य समितीतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर महासभेत नवीन सदस्यांची (Member) नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी नगरसचिव कार्यालयाने (Offices of Municipal Secretary) प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर केला.

मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला
स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले

आयुक्तांच्या मंजुरीनंतर नवीन सदस्य निवडीचा प्रस्ताव महापौरांकडे (Mayor) सादर झाला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता संपताच सदस्य निवडीसाठी विशेष सभेचा अजेंडा काढला जाण्याची शक्यता होती. मात्र, आचारसंहिता शिथिल झाली, स्थायी समितीची आठ सदस्यांच्या उपस्थितीत सभाही झाली, तरीही सदस्य निवडीचा अजेंडा रखडला आहे.

मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला
स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पामुळे वीज बिलात 70 टक्के बचत

दरम्यान, यंदा स्थायी समितीचे सभापती (Speaker) पद शिवसेनेला दिले जाणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकार्‍यांमध्ये चर्चेच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत.

मनपा स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा अजेंडा रखडला
शून्य ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची होणार आरोग्य तपासणी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com