महानगरपालिका : ‘स्थायी’त भाकरी फिरली

सभापती वाकळे यांचा राजीनामा
महानगरपालिका : ‘स्थायी’त भाकरी फिरली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थायी समितीच्या (Standing Committee) रिक्त जागांवर सदस्य निवडीसाठी (Election) शुक्रवारी झालेल्या सभेत विद्यमान सभापती कुमार वाकळे (Speaker Kumar Wakale) यांनी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा (Resignation) दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या नऊ जागांवर सभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.

गटनेत्यांनी दिलेल्या नावानुसार महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी नऊ सदस्यांची नावे घोषित केली. दरम्यान, सदस्य निवडीनंतर आता सभापती निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्य एक फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. या रिक्त जागांवर नवीन सदस्य निवडीसाठी शुक्रवारी विशेष महासभा (Meeting) बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरूवातीलाच विद्यमान सभापती वाकळे यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आणखी एक जागा रिक्त झाली. नगरसचिव एस. बी. तडवी यांनी गटनेत्यांना नावे सादर करण्याची सूचना दिली.

शिवसेनेतील नगरसेवक बाळासाहेब बोराटे (Corporators Balasaheb Borate) यांना स्थायी समितीत संधी न दिल्याने ते नाराज झाले आहेत. संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी आदेश देऊनही डावलण्यात आल्याचा आरोप (Accusation) त्यांनी केला आहे. मात्र, बोराटे यांनी इच्छाच व्यक्त केली नव्हती, त्यांची मागणीच नव्हती, असे गटनेत्या तथा महापौर शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे. सदस्यत्वासाठी ज्यांनी मागणी केली होती, त्यांच्या नावावर बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याचेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बसपाचे गटनेते मुदस्सर शेख पुन्हा एकदा स्थायी समितीत आले आहेत. मागील शिवसेना (Shivsena) व भाजपच्या (BJP) सत्ताकाळात ते काँग्रेसमध्ये (Congress) असतानाही समितीत होते. भाजपची सत्ता आल्यापासून गेली चार वर्षे ते सदस्य आहेत. अशी गेली आठ वर्षे ते स्थायी समितीचे सदस्य आहेत. आता पुन्हा एकदा वर्षभर ते सदस्य असणार आहेत. सलग 8 ते 9 वर्षे स्थायी सभागृहात सदस्य म्हणून राहणारे ते पालिकेच्या इतिहासातील एकमेव नगरसेवक आहेत.

दुसरीकडे, स्थायी समिती सभापतिपद शिवसेनेला व सभागृह नेता पद राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) देण्याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. सभापती पदासाठी गणेश कवडे (Ganesh Kawade) यांना संधी मिळणार असून, त्यांच्या निवडणुकीनंतर सभागृह नेता पदावर विनीत पाऊलबुधे यांची निवड करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नवीन सदस्य

शिवसेनेकडून गटनेत्या तथा महापौर शेंडगे यांनी सुवर्णा गेनाप्पा, सुनीता कोतकर, कमल सप्रे यांची नावे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटनेते संपत बारस्कर यांनी नजीर शेख, सुनील त्रिंबके व स्वतःचे नाव दिले. भाजपकडून गटनेत्या मालन ढोणे यांनी प्रदीप परदेशी व पल्लवी जाधव यांची नावे दिली. बसपाकडून मुदस्सर शेख यांनीही स्वतःचे नाव दिले. महापौरांनी या नऊ जणांची नवीन सदस्य म्हणून नावे घोषित केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com