मनपा स्वच्छता कर्मचार्‍यांचा तळतळाट आंदोलनाचा इशारा

सफाई ठेकेदारावर कारवाईची मागणी
मनपा स्वच्छता कर्मचार्‍यांचा तळतळाट आंदोलनाचा इशारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपाने (Municipal Corporation) एक महिन्यांसाठी नाले सफाईचा ठेका (cleaning contract) दिला असतांना तीन महिन्यांपर्यंत हा ठेका चालवला जातो. मजुरांना दिलेल्या मजुरीत तफावत आढळून येते. मजूर संख्येतही तफावत दिसून येते. सर्वात जास्त तक्रारी (Complaints) असतानाही मनपा पुण्याच्या संस्थेवर का मेहेरबान होते? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कागद, काच, पत्रा वेचक संघटनेने केली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास तळतळाट आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वच्छ शहर (Clean city), हरित शहर (Green city) अश्या विविध घोष वाक्यांनी नगरमधील भिंती रंगवल्या जातात. मात्र, आरोग्य सेवा चोख दिली जाते का असा प्रश्न आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांना दिली जाणारी रोजंदारी आणि प्रत्यक्ष दाखवली जाणारी रोजंदारी यात तफावत दिसते. प्रत्यक्ष कामावर असणारे मजूर आणि हजेरी पुस्तकावरील संख्या यातही फरक असतो. मजुरांच्या पैशावर ठेकेदारांचा डोळा आहे. असे मानल्यास त्याचा मनपातील खरा सूत्रधार कोण? आरोग्य सेवेत मूलभूत क्रांती हवी, अशी अपेक्षा व्यक्त होतांना नगर महापालिकेत (Municipal Corporation) मात्र ही सेवा कमकुवत करण्याचा आणि ठेक्याच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रार आहेत.

शहरातील साफसफाई व नाले सफाईच्या कामांचा मजुरांचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट (पुणे) यांना 30 दिवसांसाठी देण्यात आला होता. त्यात प्रत्येक मजुराला दिवसाकाठी 545 रुपये याप्रमाणे मजुरी देण्याचा करार करण्यात आला. एक महिन्यांचा ठेका परंतु प्रत्यक्षात हा ठेका 3 महिने (जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2020) पर्यंत कार्यरत होता. ठेकेदाराने मजुरांची दाखवलेली संख्या आणि प्रत्यक्ष कामावर असणार्या संख्येत तफावत आढळून आलेली आहे. यासर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नगर येथील कागद, काच, पत्रा वेचक संघटनेने केली आहे. 15 दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तळतळाट आंदोलन केले जाईल, असे संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com