महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगणार

महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराचे रस्ते खड्डेमय (Pits) आहेत. महापालिकेचा (Municipal Corporation) भोंगळ व टक्केवारीच्या निकृष्ट (Inferior) कारभाराचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. महापालिकेच्या (Municipal Corporation) माध्यमातून तातडीने सर्व रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा येत्या पंधरा दिवसात महापालिकेची (Municipal Corporation) अब्रू (Abru) दिल्लीगेटच्या वेशीवर (Delhi Gate) टांगून, महापालिकेचे (Municipal Corporation) नामांतर लोकशाहीतील कृष्णविवर महानगरपालिका (Municipal Corporation) करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने अ‍ॅड.कारभारी गवळी (Advt. Karbhari Gavali) व अशोक सब्बन (Ashok Sibban) यांनी दिली.

महापालिकेच्या (Municipal Corporation) कोट्यवधी रुपयांच्या अंदाजपत्रकातील निधी रस्त्यांवर खर्च केला जातो. निकृष्ट (Inferior) दर्जाचे रस्ते दर पावसाळ्यात खराब होत असून, या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. खड्डेमय रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेत टक्केवारीच्या भ्रष्टाचाराने (Corruption) चांगल्या दर्जाची कामे होत नसल्याचा आरोप (Allegations) संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

शहरात एक रस्ता चांगला राहिलेला नाही. अंदाजपत्रकातील निधी (Fund) आणि नागरी सुविधा गिळंकृत करणारी कृष्णविवर महापालिका बनली असल्याचे अ‍ॅड. गवळी (Advt. Karbhari Gavali) यांनी म्हटले आहे. महापालिकेत कायदा नावाचा प्रकार राहिलेला नाही. अनागोंदी कारभार सुरु आहे. अनेक पक्के बांधकाम पाडण्याचे नोटीस बजावून देखील ते हटविण्यात आलेले नाहीत. नागरिक फक्त घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर टॅक्स भरण्यासाठी राहिले आहेत. त्या मोबदल्यात त्यांना नागरी सुविधांचा अधिकार मिळत नसल्याचे अशोक सब्बन (Ashok Sibban) यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.