स्मार्ट एलईडी अखेर टप्प्यात

महापालिकेकडून 35 हजार दिव्यांसाठी कार्यारंभ आदेश
स्मार्ट एलईडी अखेर टप्प्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर नगर शहरातील (Nagar Times) रस्त्यांवर स्मार्ट एलईडी दिव्यांचा प्रकल्प (Project of Smart LED Lights) मार्गी लागला आहे. सध्याच्या पथदिव्यांवरील जुने दिवे काढून त्याऐवजी 35 हजार नवीन स्मार्ट एलईडी दिवे (Smart LED Lights) बसवण्यासाठी एजन्सीला मनपाने कार्यारंभ आदेश दिले. या आदेशामुळे पुढील सात वर्षे पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

अहमदनगर महानगरपालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) इस्मार्ट संस्थेला (Smart Organization) स्मार्ट एलईडी पथदिवे (Smart LED Streetlights) बसविण्याच्या कार्यारंभ आदेश आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap), मनपा आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore), उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale), विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे (Leader of the Opposition Sanjay Shendge) यांच्या उपस्थितीत दिला.

आयुक्त गोरे (Municipal Commissioner Shankar Gore) म्हणले की, नगर शहरात डिझाईन, बिल्ड फायनान्स ऑपरेट मेंटेन मॉनिटाईझ अँड ट्रान्सफर (डीबीएफओएमएमटी) (Build Finance Operate Maintain Monetize and Transfer) तत्त्वावर एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे शहरात स्मार्ट एलईडी (Smart LED Streetlights) बसवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प तांत्रिक कारणांसह तक्रारींमुळे खोळंबला होता. निविदाकारांना प्रात्यक्षिक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ज्या एजन्सीचे दिवे अधिक वीजबचत करून जास्तीचा प्रकाश देतील त्या संस्थेला निकष तपासून कार्यारंभ आदेश देण्यात येणार होते.

परंतु, प्रात्यक्षिकाच्या मुद्द्यावरून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली होती. न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वीच निकाल दिल्यानंतर मनपाने पुढील प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार मनपाने ई स्मार्ट एनर्जी संस्थेची निवड केली. नगरसेवकांनी पुन्हा तक्रारी केल्यानंतर या संस्थेने काम केलेल्या जामनगर व मोहाली महानगरपालिकांकडून मनपाने मत मागवले होते. सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर ई-स्मार्ट संस्थेला (e-smart organization) कार्यारंभ आदेश देण्यात आले.

अनेक वर्षांपासून पथदिव्यांचा प्रश्न प्रलंबित होता. डीबीएफओएमएमओ तत्वावर स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित एजन्सीला या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच नगर शहरातील पथदिवे स्मार्ट होतील, याचा आनंद आहे.

- रोहिणी शेंडगे, महापौर

ई स्मार्ट एजन्सी शहरातील जुने दिवे काढून पुढील चार महिन्यांत नवीन दिवे बसवणार आहे. प्रत्येक पोलला नंबर असल्याने नागरिकांनी तक्रार केल्यानंतर 24 तासांत दिवा सुरू करण्याचे बंधन संबंधित एजन्सीवर असेल. अन्यथा मनपाकडून एजन्सीवर दंड आकारणी होऊ शकते.

- शंकर गोरे, मनपा आयुक्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com