स्वच्छ सर्वेक्षणसाठी मनपाची लगबग

केंद्र सरकारची टीम कधीही करू शकते पाहणी
स्वच्छ सर्वेक्षणसाठी मनपाची लगबग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan) सुरु करुन स्वच्छ, सुंदर हरित शहर (Beautiful Green City) बनवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते या माध्यमातून अहमदनगर शहराने (Ahmednagar City) स्वच्छते संदर्भात कात टाकली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची केंद्रीय टीम कधीही नगरला भेट देऊ शकते ही शक्यता गृहीत धरून महापालिकेची (Ahmednagar Municipal Corporation Preparation) लगबग सुरू झाली आहे.

शहरांमध्ये गेली तीन वर्षांपासून स्वच्छतेचे विविध उपाय योजना करुन अहमदनगर शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध मानांकन मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अभियानामध्ये अहमदनगर महानगरपालिकेने फाइव स्टार मानांकनासाठी सहभाग घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये स्वच्छतेच्या विविध उपाय योजना सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची स्वच्छ सर्वेक्षणाची टीम दाखल झाली आहे. ते अचानक पणे शहरात विविध भागात जाऊन भेटी देत आहेत. स्वच्छतेबाबत महापालिकेने ही सर्व पूर्वतयारी करून ठेवली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com