मनपाच्या पिंपळगाव माळवी जागेत बेसुमार वृक्षतोड

सुमारे पाचशे झाडे तोडल्याचा अंदाज
मनपाच्या पिंपळगाव माळवी जागेत बेसुमार वृक्षतोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) मालकीच्या पिंपळगाव माळवी (Pimpalgav Malavi) येथील जागेत बेसुमार वृक्षतोड (Deforestation) करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात मनपाच्या उद्यान विभागाकडून (Department of Parks) पाहणी करण्यात आली असून, याप्रकरणी पंचनामा (Panchnama) करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे साडेचारशे ते पाचशे झाडे तोडण्यात (Tree Cuting) आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पिंपळगाव माळवी (Pimpalgav Malavi) येथे महापालिकेची 700 एकर जागा आहे. यातील काही एकर जागेमध्ये तलाव (Lake) आहे. तर शेकडो एकर जागा विनावापर पडून आहे. त्यात अनेक वर्षांपासून काही नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे. मागील काही दिवसांपासून येथील काही अतिक्रमणधारक (Encroachment) नागरिकांनी महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या जागेतील झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. महापालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान (Head of Parks Department Shashikant Najan) यांनी त्याची पाहणी केली होती. सुट्टीच्या दिवशी गेल्या काही दिवसापासून गुपचूप हा प्रकार सुरू होता. अखेर महापालिकेने याची गांभीर्याने नोंद तपासणी सुरू केली आहे.

उद्यान विभाग प्रमुख नजान यांनी विजय कुलाळ, गणेश दाणे या कर्मचार्‍यांसमवेत मंगळवारी पिंपळगाव माळवी येथे जाऊन पंचनामा सुरू केला आहे. सुमारे साडेचारशे ते पाचशे झाडे तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी पंचनामा पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे व त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नजान यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com