बदनामीला अधिकारीही जबाबदार

बदनामीला अधिकारीही जबाबदार

खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, मुलभूत सुविधांचा अभाव । महापालिकेवर निवेदनांचा पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

शहरात मुलभूत सुविधांचा अभाव आणि खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते (Road) यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाने महापालिकेला (Municipal Corporation) धडक दिली आहे. विविध संघटनांनंतर आता नागरिकांनीही आपला रोष व्यक्त करत महापालिकेला (Ahmednagar Municipal Corporation) जाब विचारणे सुरू केले आहे. मंगळवारी शेकडो नागरिकांनी महापालिकेला निवेदन देत या परिस्थितीला लोकप्रतिनिधींसोबत अधिकारीही जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे.

मंगळवारी संतप्त नागरिकांनी रांगा लावून महापालिकेत (Ahmednagar Municipal Corporation) निवेदन देत जागे करण्याचा प्रयत्न केला. आपला परिसर व त्रासाचा उल्लेख करत ही निवेदने देण्यात आली. उपायुक्त कुर्‍हे (Deputy Commissioner Kurhe) यांनी निवेदने स्वीकारली. 18 वर्षे झाली तरी नगर शहरातील (Nagar City) मुलभूत प्रश्न महापालिकेला (Ahmednagar Municipal Corporation) सोडविता आलेले नाहीत. महापालिका अधिकारी या प्रश्नांकडे लक्ष देवून ते सोडवतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. शहरात एकही रस्ता खड्ड्यांविना नाही. या खड्ड्यांमुळे (Pits) शहर बदनाम होत आहे. एकेकाळी सकारात्मक ओळख असलेले नगर शहर (Nagar City) या खड्ड्यांमुळे बदनाम होत असेल तर यास लोकप्रतिनिधींसोबत महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) अधिकारीही जबाबदार आहेत.

मुलभूत सुविधांसाठी आजही भांडावे लागत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे, याची जाणीव महापालिका अधिकार्‍यांना कधी होणार? नागरिक महापालिकेला कर भरतात, त्याचा हा परतावा आहे का? करोना काळात सर्वांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे. आता खराब रस्त्यांनी वाहन दुरूस्तीचा अतिरिक्त भार वाढला आहे. याची भरपाई महापालिका देणार आहे का, असा सवाल या निवेदनांमधून करण्यात आला आहे.

रस्त्यांवर पँचिंगचे (Road Patching) ठिगळ लावले जात आहे. त्यावर कोण लक्ष देत आहे? पॅचिंगचे हे ठिगळ किती दिवस टिकणार? महापालिकेकडे विचारणा केली तर तीच ती सरकारी उत्तरे मिळतात. सामान्य नागरिकांनी किती दिवस या नरक यातना सोसायच्या? आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि खड्ड्यांसह (Pits) अन्य समस्यांवर तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी या निवेदनांमधून करण्यात आली आहे.

शहरातील सर्वच रस्त्यांची भयाण अवस्था झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी गुलमोहर रस्त्यावरील खड्ड्यातून गाडी घसरल्याने जीवघेण्या अपघातातून बचावले. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया सोशल माध्यमावर टाकली. त्याला अनेकांचा प्रतिसाद मिळाला. मग एक ग्रुप बनविला. सर्वांनीच महापालिकेच्या अभियंत्यांना जाब विचारला, मात्र काहीच उपयोग झाला नाही. म्हणून आज खड्ड्यांप्रश्नी नागरिकांनी उपायुक्तांना निवेदन दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये केले जाणारे पॅचिंग म्हणजे आजारापेक्षा औषध भयानक आहे. लवकरात लवकर प्रशासनाने नवीन रस्ते तयार करून मेहेरबानी करावी. नागरिकांचे जीव गेल्यावरच महापालिका प्रशासन जागे होणार का?

- सुजाता पायमोडे, नागरिक

.. तर स्वखर्चातून मॉडेल रस्ता बनवू

दिवसभरात 1000 नागरिक प्रशासनाला निवेदन देतील. निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने काहीच निर्णय घेतला नाही, तर समविचारी नागरीक स्वखर्चातून शहरातील खराब झालेला एक रस्ता दर्जेदारपणे पुन्हा तयार करतील. या तयार झालेला मॉडेल रस्त्याप्रमाणेतरी महापालिकेने इतर रस्ते बनवावेत, अशी संतप्त अपेक्षा नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.