मनपाचे अधिकारी सयाजीराव!

ढिसाळ कारभाराविरोधात आमदारांचा संताप
मनपाचे अधिकारी सयाजीराव!

अहमदनगर | प्रतिनिधी

महापालिका (Municipal Corporation) अधिकारी व कर्मचारी आपल्या केबीनमध्ये बसून फायलींवर सह्या करण्यात व्यस्त आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. हे अधिकारी व कर्मचारी सयाजीराव झाले आहेत, असा आरोप आमदार संग्राम जगताप (sangram jagtap) यांनी केला आहे. महापालिकेविरोधात अलिकडच्या काळात आमदार आक्रमक झाल्याने जनतेला मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आमदारांनी शहरातील विविध नागरी समस्यांची पाहणी केली. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वत्र अनधिकृत पार्किंग, अस्वच्छता, ठिकठिकाणी कचर्याचे ढीग, विद्युत पोलवर जाहिरातींचे अनधिकृत फलके, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नगर शहरातील जनतेसाठी महापालिकेकडून कुठलेही चांगले काम होताना दिसत नाही. यापुढील काळात कामचुकारांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी मनपा आयुक्तांना केले.

अहमदनगर शहर स्वच्छ, सुंदर, हरित राहण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अधिकारीवर्ग ठेकेदारांच्या बैठका करण्यात व्यस्त आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकार्‍यांकडे वेळ नाही. यापुढील काळात नागरिकांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा शासन दरबारी तक्रार केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक कुमार सिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, संतोष ढाकणे तसेच आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com