महापौर पदासाठी शिवसेनेने कंबर कसली

महापालिका: राजकीय हालचालींना वेग
महापौर पदासाठी शिवसेनेने कंबर कसली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसे चर्चा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आगामी महापौर पद मिळविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून आज शिवसेनेचे नगरसेवक मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. शिवसेना राष्ट्रवादी सोबत युती करून महापौर पद प्राप्त करण्याचा विचार करीत असली तरी, वेळ आली तर भाजपाच्या पाठिंब्याचाही विचार करू शकते. अर्थात याबाबत निर्णय राज्य पातळीवर होण्याची शक्यता आहे. कुठल्याही स्थितीत महापौरपद मिळविण्याचे शिवसेनेने ठरवले असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, येत्या 30 जून रोजी विद्यमान महापौर यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणूकीची घोषणा कधी होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणूक जाहिर झाली नसली तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आ. संग्राम जगताप हे महापौरपदाच्या निवडणुकीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर भाजप सत्तेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची मदत मिळेल याचा विचार करूनच आ. जगताप निर्णय घेतील अशी शक्यता आहे. शिवसेनेचे 23 व राष्ट्रवादीचे 19 नगरसेवक एकत्र आले तर शिवसेनेचा महापौर होऊ शकेल भाजपाने उमेदवार नसल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसकडे महापौरपद मिळविण्या इतके बलाबल नाही. त्यामुळे शिवसेनेकडे महापौर पद जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तेच्या गणितावर नगर महापालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार यात शंका नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com