नगर महापालिकेला स्थानिक निधी लेखा परीक्षणाचा विसर

तक्रारीनंतर 2016-2017 व 2017-2018 लेखा परीक्षणाला सुरूवात
नगर महापालिकेला स्थानिक निधी लेखा परीक्षणाचा विसर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासन निर्णयानुसार दरवर्षी स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागामार्फत नगर महापालिकेच्या संपूर्ण कामकाजाचे व आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण केले जाते. मात्र, 2016-2017 या आर्थिक वर्षापासून महापालिकेत लेखापरीक्षणच करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. लोककार्य आणि लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी वित्त विभागाच्या सचिवांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर शासनाला जाग आली आहे. 23 स्पतेंबरपासून सन 2016-2017 व 2017-2018 या दोन वर्षाच्या कामकाजाचे लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे.

स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागामार्फत दरवर्षी महानगरपालिकेच्या कामकाजाचे व आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण केले जाते. यापूर्वी 2011-2012 ते 2015-2016 या पाच आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण करण्यात आलेले आहे. मात्र, त्यानंतर सन 2021-2022 या आर्थिक वर्षापर्यंत मागील सहा वर्षात महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षणाच झालेले नाही. हेमंत ढगे यांनी शासनाच्या वित्त विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.

लेखापरीक्षा न करणार्‍या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर शासनाला जाग आली असून, स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या सहसंचालकांमार्फत 23 सप्टेंबर पासून लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या उपसचिवांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com