महापालिकेच्या चार अभियंत्यांसह 132 कर्मचार्‍यांना पदोन्नती

महापालिकेच्या चार अभियंत्यांसह 132 कर्मचार्‍यांना पदोन्नती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेतील (Municipal Corporation) चार अभियंत्यांसह (Engineers) तब्बल 132 कर्मचार्‍यांना पदोन्नती मंजूर (Approved) करण्यात आली आहे. आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 98 कर्मचार्‍यांना कालबद्ध, तर 34 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीला समितीच्या बैठकीत मंजुरी (Approval) देण्यात आली आहे.

अभियंते, प्रभाग अधिकारी, वरिष्ठ लिपिक यासह विविध पदांवर कार्यरत कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासंदर्भात आस्थापना विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करून पदोन्नती समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले 64 व 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले 34 अशा 98 कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.

तसेच सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ लिपिक, स्वच्छता निरीक्षक, मिळकत अधीक्षक अशा पदांवरील 34 जणांना पदोन्नती समितीच्या बैठकीत पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. यात आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक साबळे यांची सहाय्यक आयुक्त म्हणून बढती करण्यात आली आहे. तर अभियंता गणेश गाडळकर, मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, सदाशिव रोहोकले आदी शाखा अभियंत्यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. मिळकत अधीक्षक म्हणून प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

समितीच्या बैठकीत पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. यात आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक साबळे यांची सहाय्यक आयुक्त म्हणून बढती करण्यात आली आहे. तर अभियंता गणेश गाडळकर, मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, सदाशिव रोहोकले आदी शाखा अभियंत्यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. मिळकत अधीक्षक म्हणून प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com