महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’कडून चाचपणी

आम आदमी पार्टीच्या राज्य समिती नगर दौर्‍यावर
महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’कडून चाचपणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर महापालिकेच्या (Municipal Corporation) आगामी निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) चाचपणी सुरू केली आहे. केजरीवाल (Kejriwal) यांनी दिल्लीचा विकास केला, त्याच धर्तीवर अहमदनगर शहराचा (Ahmednagar City) विकास करायचा आहे. त्यासाठी पार्टी प्रत्येक प्रभागात उमेदवार (Candidate) देणार आहे, असे पक्षाचे संघटक विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी सांगीतले.

आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) राज्य समितीने नगर (Nagar) दौरा केला. आगामी काळात होणार्‍या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात (Municipal Corporation Election)) पक्षाच्या तयारीची चाचपणी यावेळी करण्यात आली. पक्ष कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्य समितीचा दौरा असल्याचे कुंभार (Vijay Kumbhar) यांनी सांगीतले. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र सहसंयोजक किशोर मध्यान, महाराष्ट्र संघटक विजय कुंभार, महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे आदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सचिव शिंदे म्हणाले, केंद्रातील भाजपाचे व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी झाले आहे.

अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये अहमदनगर पालिकेची निवडणूक (Ahmednagar Municipal Corporation Election) लढवण्यासाठी खूप उत्साह आहे.त्यांना बळ देण्यासाठी पक्ष सदैव त्यांच्या मागे उभा राहणार आहे. ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीचा विकास केला आहे त्याच धर्तीवर अहमदनगर शहराचा (Ahmednagar City) विकास करायचा आहे.

शहरातील सुशिक्षित डॉक्टर, वकील, उद्योजक व तरुणांना पक्षसंघटनेत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहे, असे विजय कुंभार यांनी सांगीतले. यावेळी मेजर भरत खाकाळ यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिलीप घुले, भरत खकाळ, बाळासाहेब कटके, अश्विन शेळके, सुचिता शेळके, संपत मोरे, बजरंग सरडे, राजेंद्र कर्डिले, रवींद्र सातपुते, शिवाजी सानप, शकीलभाई शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com