मनपाच्या ड्रेनेज लाईनची तोडफोड

उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा छावाचा इशारा
मनपाच्या ड्रेनेज लाईनची तोडफोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील बालिकाश्रम रोडवरील (Balikashram Road) वाघमळा, विठ्ठलवाडी येथील दोघा रहिवाशांनी ड्रेनेज लाईनची तोडफोड (Drainage Line) करून महापालिकेच्या (Municipal Corporation) मालकीच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान (Damage to Public Property) केले आहे. तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचे कृत्य केले आहे. यासंदर्भात पालिका आणि जिल्हा प्रशासन (District Administration) तसेच पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा याची दखल घेत नसल्याने हा प्रश्न छावा क्रांतिवीर सेनेने तडीस लावण्याचे ठरविले आहे.

याप्रकरणी पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान (Damage to Public Property) करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी उद्या (दि.1) महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा (Hint Fasting Movement) देण्यात आला आहे. याची दखल न घेतल्यास मंगळवारी 3 तारखेला आत्मदहनाचा इशारा (A warning of self-immolation) दिला आहे.

मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना छावा संघटनेने स्मरण पत्र देखील दिले आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवासी लक्ष्मण ढगे हे कुटुंबीय व इतर रहिवाशासोबत उपोषणास बसणार आहेत. तसेच या उपोषणाची रितसर दखल घेऊन मनपाने कारवाई न केल्यास 3 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा ढगे यांनी दिला आहे. या भागातील स्थानिक रहिवासी रंजनीश वाघ आणि दीपक कावळे या दोघांनी जागा बळकावण्याच्या उद्देशाने वाघमळा येथील ड्रेनेज लाईनची तोडफोड केली आहे.

ही लाईन सार्वजनिक जागेतून जात असताना त्यांनी त्यात दगड घालून ती बुजवली तसेच टिकाव घालून फोडली. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची ड्रेनेज लाईन बंद होऊन विठ्ठलवाडी वाघमळा, सिद्धार्थनगर येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 13 मार्चला या दोघांनी हे कृत्य केले होते. ही तोडफोड हे दोघे करीत असताना व्हिडीओ चित्रीकरण देखील झाले होते. फोटो देखील काढण्यात आले होते त्याचे रितसर पुरावे देऊनही मनपा फक्त पंचनामा, परिसर पाहणीचा खेळ खेळत आहे. आणि राजकीय दबावापोटी कारवाईस टाळाटाळ करीत आहे. या समस्येची दखल प्रशासनाने घ्यावी यासाठी ढगे यांनी उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.