
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) कर्मचार्यांची दिवाळी गोड (Diwali to the employees) व्हावी यादृष्टिने सानुग्रह अनुदान (Sanugrah Grant) म्हणून आठ हजार 500 रूपये व सहाव्या वेतन आयोगातील फरकापोटी एक हप्ता देण्याबाबत निर्णय महापालिकेने (Municipal Corporation) घेतला आहे. तसेच कर्मचार्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी अॅडव्हान्स देखील मिळणार आहे. सर्व रक्कम कर्मचार्यांना दिवाळी सणाच्या 15 दिवस आधी देण्याच्या दृष्टिने कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले असल्याचे महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना (Ahmednagar Municipal Corporation Employees) दिवाळी सणानिमित्त (Diwali Festival) बोनस (Bonus), सानुग्रह अनुदान, थकीत देणे दिवाळी पूर्वी मिळणेबाबत कामगार युनियनने मागणी (Demand unions) केली होती. या संदर्भामध्ये महापौर शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती. यावेळी स्थायीचे सभापती अविनाश घुले (Permanent Speaker Avinash Ghule), महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरूडे, नगरसेवक शाम नळकांडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर (Anant Vaykar) तसेच पदाधिकारी उपस्थित होते. महापौर शेंडगे (Mayor Rohini Shendge) म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षापासून करोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनाच्या काळात देखील कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव (Corona) ओसरत असतानाच तिसर्या लाटेची (Third Wave) शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असताना देखील मनपाचे अधिकारी, कर्मचारी नागरी सुविधा चांगल्या प्रकारे देत आहे. कामगार युनियनने दिवाळी सणा निमित्त कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान (Sanugrah Grant) व थकीत देणे देण्याबाबत मागणी केली होती. याबाबत बैठक घेवून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
आमची मागणी कर्मचार्यांना 20 हजार रूपये सानुग्रह अनुदान देणे बाबत होती. तसेच थकीत देणे देखील देणबाबत मागणी केली होती. करोनाच्या काळात सर्वांनी चांगले काम केले आहे. कर्मचार्यांची देणी भरपूर आहेत. महापौर व पदाधिकारी यांनी योग्य निर्णय घेवून 10 ते 11 हजार रूपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी केली होती. परंतु महापौर व पदाधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी कर्मचार्यांसाठी आठ हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान व सहाव्या वेतन आयोगाचा एक हप्ता देण्याचे मान्य करून कर्मचार्यांसाठी चांगला निर्णय घेतला.
- अनंत लोखंडे (अध्यक्ष, कामगार युनियन)