घरी जावून दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण

महापालिकेचा उपक्रम : गरोदर मातेच्या लसीकरणास सुरूवात
घरी जावून दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - महानगरपालिकेच्या वतीने कै. बाळासाहेब देशपांडे रूग्णालय येथे गरोदर मातेच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी लसीकरण फिरत्या पथकाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. सतिष राजूरकर, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेणाप्पा, माजी महापौर तथा नगरसेविका सुरेखा कदम, नगरसेविका मंगल लोखंडे, आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

करोना संकट काळामध्ये गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने सोमवारपासून देशपांडे रूग्णालयामध्ये गरोदर मातेला कोविड लसीकरणाला सुरूवात केली आहे. गरोदर मातेची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भिती मोठ्या प्रमाणात असते. तसेच लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या ठिकाणी गरोदर मातेला जाणे योग्य नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देशपांडे रूग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे. याच बरोबर दिव्यांग व्यक्तीला लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाता येत नसल्यामुळे मनपाच्या वतीने दिव्यांग व्यक्तीच्या घरी जावून लसीकरण केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com