स्वहिस्सा वर्ग न करताच मनपाने केली कामे

ठेकेदारांची कोट्यवधींची बिले रखडली
स्वहिस्सा वर्ग न करताच मनपाने केली कामे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमध्ये स्वहिस्सा न टाकताच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या निधीतून कामे करण्यात आली. मात्र, आता मनपाकडे स्वहिस्स्याच्या रकमेची तरतूद करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने सुमारे एक कोटींची देयके रखडली आहेत. तर दुसरीकडे नागरी दलितेतर वस्ती योजनेअंतर्गत नियोजन मंडळाकडून 100 टक्क्यांऐवजी 70 टक्केच निधी मिळाल्यामुळे त्यातील कामांचीही सुमारे एक कोटींपेक्षा अधिक रकमेची देयके थकीत आहेत.

महापालिकेला जिल्हास्तर नगरोत्थान योजनेमधून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होतो. या निधीमध्ये मनपाला स्वहिस्स्याची 30 टक्के रक्कम भरावी लागते. नियमानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मंजूर झाल्यानंतर त्यात मनपाने स्वहिस्स्याची रक्कम वर्ग करून त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविणे व त्या निधीतून कामे करणे आवश्यक होते. महापालिका प्रशासनाने स्वहिस्सा वर्ग न करताच सदरची कामे केली.

आता मनपाकडे स्वहिस्याचा निधी उपलब्ध नसल्याने या कामांची सुमारे एक कोटी रुपयांची देयके थकली आहेत. शासन निर्देशानुसार महापालिकेने त्यांना मिळालेल्या निधीमध्ये स्वहिस्याची तरतूद करून त्यानंतर निविदा प्रक्रिया व कामे करणे आवश्यक होते. मनपाने मात्र नियम डावलून ही कामे केल्यामुळे ठेकेारांच्या बिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com