
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अकोला महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी नगरविकास विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. डॉ. जावळे यांनी यापूर्वी अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिलेले आहे.
दरम्यान आयुक्त शंकर गोरे यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त गोरे यांच्या बदलीबाबत मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. करोना महामारीच्या काळात त्यांची महापालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
आता त्यांच्या जागी अकोला महापालिकेचे उपायुक्त डॉ. जावळे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. जावळे यांनी यापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच अकोला महापालिकेत सहायक आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. गुरूवारी ते महानगरपालिकेत आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.