मनपा पोटनिवडणूकीसाठी 44 टक्के मतदान
मनपा

मनपा पोटनिवडणूकीसाठी 44 टक्के मतदान

उद्या मतमोजणी

अहमदनगर|Ahmedagar

महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) प्रभाग क्रमांक 9 (क) पोटनिवडणूकीसाठी एकुण 44.61 टक्के मतदान झाले. उद्या (बुधवार) सकाळी नऊ वाजता जुने महापालिका कार्यालय (Municipal Corporation) येथे मतमोजनी (Vote Counting) होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सुरेश तिवारी, भाजपचे प्रदीप परदेशी यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. मनसेचे पोपट पाथरे यांच्यासह अपक्ष उमेदवार ऋषिकेश गुंडला, अजय साळवे, संदीप वाघमारे निवडणूक रिंगणात आहे.

वादग्रस्त श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) याचे पद रद्द झाल्यानंतर या जागेसाठी ही निवडणूक (Election) होत आहे. मंगळवारी सहा केंद्रांमध्ये शांततेत मतदान (Voting) पार पडले. दुपारपर्यंत 16 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकुण 44.61 टक्के मतदान झाले. मतदानासाठी येणार्‍या मतदारांना माहिती देण्यासाठी सर्वच उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर बूथ लावले होते.

मनपा
पारनेर नगरपंचायत : 13 जागांसाठी झाले ‘एवढे’ टक्के मतदान

मतदान केंद्रावर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान मतदार यादीतून काही मतदारांची नावे गायब झाली होती. मतदानासाठी केंद्रावर हजेरी लावल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. यासंदर्भात अ‍ॅड. सुरेश लगड यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांच्याकडे तक्रार केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com