अहमदनगर महापालिकेतील आशा सेविकांची मानधनासाठी निदर्शने

संपावर जाण्याचा इशारा: आयुक्तांना निवेदन
अहमदनगर महापालिकेतील आशा सेविकांची मानधनासाठी निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेतील आशा कर्मचारी यांनी करोना काळात केलेल्या कामाचे मानधन व दररोज तीनशे रुपये प्रमाणे भत्ता मिळावा, कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करून संपाचा इशारा दिला. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटना व नगर जिल्हा आशा संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षा सुर्वणा थोरात, कॉ. भारती न्यालपेल्ली, स्वाती भणगे आदींसह महापालिकेच्या आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

महापालिकेत 40 आशा कर्मचारी कार्यरत असून, 10 वर्षांपासून कार्य करत आहे. त्यांना 11 महिन्यांच्या कंत्राटी पध्दतीने नेमणूक केली जात आहे. आशांची कंत्राटी पद्धतीची नेमणूक रद्द करून त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यात यावे, करोना काळात काम केलेल्या इतर जिल्ह्यातील आशांना तीनशे रुपये रोज देण्यात आले असून, महापालिकेने देखील आशांना दररोज तीनशे रुपये भत्ता द्यावा, आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा गटप्रवर्तक यांना प्राधान्य द्यावे, आरोग्य कंत्राटी कर्मचार्‍यांप्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण करण्याची मागणी, आयुक्त शंकर गोरे व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्याकडे करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com