अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोनाच्या संकटानंतर आर्थिक परिस्थिती खालवल्याने महापालिकेत अनेक वर्षांपासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बिलांची

देयके मिळण्यासाठी ठेकेदारांचे मनपासमोर उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली असता छोटी कामे करणार्या ठेकेदारांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करून देयके देण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने मनपासमोर सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.

ठेकेदारांनी महापालिकेसमोर सोमवार (दि.25) पासून उपोषण सुरू केले होते. थकित देयके मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला होता. बुधवारी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालवल्याने महापालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत सदर प्रश्न सोडविण्यास सहमती दर्शवली. मनपाचे मुख्य लेखा परीक्षक प्रविण मानकर यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडवले. या उपोषणात एस.बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागुल, विजय समलेटी, अमृत वन्नम, जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने प्रकाश पोटे, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, नवेद शेख आदी सहभागी झाले होते.