मनपाच्या गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई करावी

शिवराष्ट्र सेनेची आयुक्तांकडे मागणी
मनपाच्या गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सोमवार, 5 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेत दोन अधिकारी स्थायी समितीची सभा व लोकशाही दिन असताना देखील दिवसभर उपस्थित नव्हते. त्यांची गैरहजरीबाबत माहिती घेतली असता. त्यांचा रजेचा अर्ज देखील नव्हता तरी याबाबतची तातडीने चौकशी करून त्यांची बिन पगारी करण्यात यावी व त्यांच्या हलगर्जीपणाबाबत त्यांच्या विरोधात वित्त व लेखा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे तक्रार करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दोन्ही व्यक्ती शासनाकडील अधिकारी असून त्यांनी नियमाप्रमाणे रजा मंजूर करून घेऊन सुट्टीवर जायला पाहिजे होते. पण ते परस्पर गैरहजर राहिले व त्यामुळे त्यांच्याकडे महत्त्वाचे शहरातील आरोग्याचे जीवनावश्यक गोष्टींचे विषय असल्याने त्यांची उपस्थिती असणे महत्त्वाचे होते. यावरून असे निदर्शनास येते की, जाणीवपूर्वक नागरी सुविधांच्या आरोग्याशी व जीवीताशी खेळण्याचा प्रकार दिसून येतो. यामुळे मनपाच्या कामात खोळंबा झाला. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तरी त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम 1979 नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com