एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळणार

राज्यातील अनेक जिल्ह्यांत लाल परीची सेवा ठप्प; प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळणार

मुंबई, अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे यासह अन्य मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

पुणे, नागपूर, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यांमध्ये काल एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. दरम्यान मध्यरात्रीपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संपाची तीव्रता आज आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात या संपाला समिश्र प्रतिसाद मिळाला. तारकपूर, नेवासा, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथे कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. तर संगमनेर, कोपरगाव व अन्य ठिकाणी एसटी सुरू होत्या. पारनेरात दुपारनंतर संप सुरू झाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पुकारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.

अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद आहेत. बंद मध्ये १५०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाल्याची माहिती मिळत असून जिल्ह्यातील ३५० बसपैकी केवळ ६० ते ७० बस रस्त्यावर धावत आहेत.

ऐन दिवाळीच्या सणात बंद पुकारल्याने प्रवाशांचे राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अंबडमधील एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सांगली जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून सांगली मिरजमध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.

पुणे जिल्हात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले. आज पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, भोर , बारामती बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बारामती येथेही कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.

उस्मानाबादेत एस.टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कळंब वगळता जिल्ह्यातील एक ही बस डेपोबाहेर आली नाही. या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

आज न्यायालयात सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुरु केलेल्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही. कारण कामगार संघटना संपावर ठाम आहेत. त्यामुळं याप्रकरणी आज सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. संपाबाबत कामगार संघटनांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते, पण एसटी कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com