MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला, ...अशी होणार जिल्ह्यात परीक्षा

MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला, ...अशी होणार जिल्ह्यात परीक्षा

अहमदनगर | Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (Maharashtra Public Service Commission Mumbai) यांचेमार्फत अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत एकुण 60 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे केंद्रप्रमुख संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी अहमदनगर हे काम पहात आहेत. सदर परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर एकूण 19152 उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. शहरातील 60 उपकेंद्रांवर (शाळा/महाविद्यालयात) उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

सदर परीक्षेसाठी समन्वय अधिकारी 15 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), भरारीपथक अधिकारी 3 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), उपकेंद्रप्रमुख 60 (वर्ग 1 चे अधिकारी), सहाय्यक 60, पर्यवेक्षक 187, सहाय्यक कर्मचारी 79, समन्वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक 18, समवेक्षक 798, लिपीक 60, केअर टेकर (शाळेचे) 53, बेलमन 53, शिपाई 78, पाणी वाटप कर्मचारी 196, वाहनचालक 78 या प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी 9.30 वाजता परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षा कक्षातील उमेदवारांच्या शेवटच्या प्रवेशाची वेळ 10.30 वाजता अशी आहे. उमेदवारांनी आयोगाकडील विहित प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी आयोगाने विहित केलेल्या ओळखपत्रांपैकी स्वत:चे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल असे कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

उमेदवारांना एकमेकांचे पेन, लिखान साहित्य इ. वापरण्यास, परिक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल, कॅलक्युलेटर, डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, इ. सारखी दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मानाई करणेत आलेली आहे. या सूचनेचे उल्लघंन करणा-या उमेदवारास प्रस्तुत परीक्षेस तसेच त्यापुढील आयोगाच्या इतर सर्व परीक्षांसाठी कायमस्वरुपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे. सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांनी कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे तसेच मुखपट (मास्क), हातमोजे व सॅनिटायझर जवळ बाळगणे अनिवार्य आहे.

सदर परीक्षेकरीता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परीसरातील एसटीडी बुथ,फॅक्स, झेरॉक्स, दुकाने बंद ठेवणेकामी परीक्षेच्या दिवशी सकळी 9 वाजेपासून दुपारी 4 वाजेपावेतो परीक्षा क्षेत्रामध्ये सीआरपीसी 1973 चे कलम 144 (3) लागु करणेत आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com